महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

466 0

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीमध्ये विविध जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर मग आजच अर्ज करा.

मुख्य अभियंता, मुख्य उपअभियंता, अधीक्षक अभियंता या पदासाठी जागा भरण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या पदांसाठी एकूण ४१ जागा आहेत. मुख्य अभियंता ७ जागा, मुख्य उपअभियंतासाठी ११ जागा आणि अधीक्षक अभियंतासाठी २३ जागा भरायच्या आहेत.

मुख्य अभियंता पदासाठी इंजिनिअर पदवी असणे आणि १५ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. मुख्य उपअभियंता या पदासाठी इंजिनिअर पदवी आणि १४ वर्ष अनुभव असणे तसेच अधीक्षक अभियंता इंजिनिअर पदवी आणि १२ वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 50 वर्ष असावे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज करण्याची फी
ओपन साठी – ८००/-.
SC/ST/OBC/EWS: ६००/-.
PWD/ Female: ६००/-
फीची रक्कम DD ने पाठवायची आहे.
अधिक माहितीसाठी www.mahagenco.in या वेबसाईटला भेट द्या.

Share This News
error: Content is protected !!