पुणे दर्शनमध्ये फुले वाड्याचा समावेश करा, आम आदमी पक्षाची मागणी

405 0

पुणे- पुणे दर्शनमधून महात्मा फुले वाडा वगळण्याच्या पीएमपीएलच्या कृतीचा आम आदमी पक्षाने तीव्र विरोध केला आहे. पुणे दर्शन बस मार्गामध्ये महात्मा फुले वाड्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा फुले वाडा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले असून सध्या फुले वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या वाड्याला समता भूमी असे देखील म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने प्रेरित होऊन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक लोक फुले वाड्याला भेट द्यायला येत असतात.

फुले वाडा हा पुण्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक ठेवा आहेच, शिवाय संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा असे प्रेरणास्थळ आहे. पुणे शहरामध्ये असलेल्या अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तूंपैकी फुले वाडा ही एक प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तू आहे असे असताना देखील सध्या पुणे दर्शन या बस सेवेमधून फुले वाड्याला वगळण्यात आले आहे.

हे करताना पीएमपीएलने दिलेली कारणे ही न पटण्यासारखी आहेत. फुले वाड्याच्या नजीकच अग्निशामन केंद्राचे पुणे शहरातील मुख्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी अग्निशमन वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. अशा वेळी फुले वाड्याजवळ जायला अपुरा रस्ता आहे, ही सबब योग्य नाही. फुले वाड्याच्या रस्त्यावर जर काही अतिक्रमणे असतील तर त्याबाबत महानगरपालिकेने कारवाई करून फुले वाडा पर्यंतचा रस्ता प्रशस्त केला पाहिजे. अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!