MLC ELECTION:

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान

346 0

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 2 जून रोजी विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे.

शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील मुदत संपत आहे त्यामुळे आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे .

9 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला 4 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकते. विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच वादळी होणार असण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!