Breaking ! पुणे विमानतळावर विमानाचा टायर फुटला; विमानसेवा विस्कळीत

167 0

पुणे – लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्याची घटना आज (बुधवार)दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 

लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.

मात्र या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

विमानतळाचे दिवसाचे ७० ते ८० विमान उड्डाणांचे शेड्युल ठरलेले असते. मात्र, या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!