LIQUOR PRICE HIKE: दारू महागणार! सरकारला 14 हजार कोटींचा बोनस, तळीरामांच्या खिशाला झटका!
LIQUOR PRICE HIKE: दारूप्रेमींना (LIQUOR PRICE HIKE) आता खिशावर जास्त भार झेलावा लागणार आहे…
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या नव्या धोरणांना नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली…
आता देशी दारूपासून ते विदेशी मद्यापर्यंत.. सर्व प्रकारांवर उत्पादन शुल्क वाढणार असून, हॉटेलमध्ये दारू पिणंही अधिक महागडं होणार आहे…
AJIT PAWAR DECISION ON LIQUEUR POLICY | दारु दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महसूल वाढीच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता.
या अहवालानुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला आणि एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली.
या नियंत्रण कक्षाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील आसवन्या, मद्यनिर्माणी आणि घाऊक विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
मंत्रिमंडळाने उत्पादन शुल्काच्या दरात वाढीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.
भारतीय बनावटीचं विदेशी मद्यच्या उत्पादन शुल्कमध्ये 1.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली 180 मिली दारूची किंमत आता 205 रुपये असेल.
प्रिमियम विदेशी ब्रँड किंमतीत वाढ होऊन 360 रुपये प्रति बाटलीपर्यंत पोहोचणार आहे. देशी दारू 80 रुपये आणि महाराष्ट्र निर्मित दारू 148 रुपये प्रति बाटली असणार आहे.
सीलबंद विदेशी मद्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये भाडेतत्त्वावर विक्रीसाठी 10 ते 15 टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार.
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र निर्मित दारू’ ही नवी श्रेणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळणार असून आणि राज्याच्या महसूलात 14 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे..
