एलआयसीचे शेअर बाजारात लिस्टिंग, पण प्री ओपनिंग मध्येच शेअर कोसळला

376 0

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. बीएसईवर एलआयसीचा शेअर दर 867.20 रुपये आणि एनएसईवर 872 रुपये प्रति शेअर या दरावर लिस्ट झाला आहे. मात्र एलआयसीची सुरुवात मात्र निराशाजनक झाल्याचं दिसून येत आहे. ग्रे मार्केटमध्ये शून्याहून खाली प्रिमिअमवर ट्रेड केल्यानंतर एलआयसीचा शेअर बीएसईमध्ये प्री-ओपन सेशमध्ये १२ टक्क्यांहून अधिक कोसळला.

एलआयसी लिस्टिंगच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला ‘डिपम’चे सचिव तुहिनकांता पांडे, एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार, बीएसईचे अध्यक्ष आशिष चौहान आदींसह इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.

एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीने आपल्या प्रति शेअरसाठी 949 रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. केंद्र सरकारने एलआयसीमधील आपला 3.5 टक्के हिस्सा विकला आहे. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

पहिल्यांदाच एखादा आयपीओ विकेंडच्या दोनही दिवशी सुरू होता. रेकॉर्ड ब्रेक ६ दिवस सुरू राहिल्यानंतर एलआयसीच्या आयपीओला जवळपास सर्वच विभागात चांगला प्रतिसाद मिळला. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियम लिस्टिंगपूर्वीच शून्याहून खाली गेला आहे. ज्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना नुकसान होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

एलआयसी होणार देशातील पाचवी मोठी कंपनी

उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!