KUNDAMALA BRIDGE COLLAPSE: "फादर्स डे"च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ "फादर्स डे"च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ

KUNDAMALA BRIDGE COLLAPSE: “फादर्स डे”च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ

429 0

KUNDAMALA BRIDGE COLLAPSE :15 जूनला संपूर्ण जग ‘फादर्स डे’ साजरा करत होतं.

रविवार आणि फादर्स डे एकत्र आल्याने अनेक कुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडली होती.

मात्र याच फादर्स डे लाKUNDAMALA BRIDGE COLLAPSE : पुण्यातील बाप-लेकावर काळानं घाला घातला.

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने वाहून गेलेल्या पर्यटकांमध्ये याच बाप लेकाचा समावेश आहे.

या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

KUNDAMMA BRIDGE COLLAPSE: “फादर्स डे”च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ
15 जून रोजी रविवार होता, फादर्स डे होता आणि

त्यातच 16 जून रोजी लहान मुलांच्या शाळा सुरू होणार असल्यानं 15 जूनला पुणे

आणि आजूबाजूचा परिसरातील पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडले होते.

पुण्यातील मावळ मध्ये असलेला कुंडमळा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहतो.

त्यामुळे या भागात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.

रविवारी ही तशीच गर्दी होती.

MAHARASHTRA RAIN:22 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज-यलो अलर्ट!; राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ

हजारो लोक या परिसरात धबधबा आणि इंद्रायणी नदीचा कोसळून वाहणारा प्रवाह पाहण्यासाठी आले होते.

याच इंद्रायणी नदीवर दोन्ही काठांना जोडणारा

लोखंडाचा 35 वर्ष जुना पूल होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा पूल एक-दीड महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद केला होता.

तसा एक फलकही तिथे लावलेला होता. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांची या परिसरात गर्दी वाढली.

यावेळी पुलावर पर्यटकांना जाण्यापासून अडवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं होतं. मात्र तसं झालं नाही.

त्यामुळेच रविवारी अनेक पर्यटक या पुलाचा वापर करत होते.

POLITICAL LEADER AEROPLANE ACCIDENT:आजपर्यंत कोणत्या प्रमुख व्यक्तींचा,नेत्यांचा विमान अपघातात झाला मृत्यू

दुपारी साडेतीन चा सुमारासरी अशाच पद्धतीने १०० ते २०० पर्यटक या पुलावर उभे राहून नदीचे पाणी पाहत होते.

रविवारच्या सुट्टीचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी रोहित माने हे त्यांची पत्नी, सासू व मुलगा विहानसह इंद्रायणी पाहायला गेले होते.

रोहित माने त्यांची पत्नी आणि मुलगा ‌विहान सह याच धोकादायक पुलावर उभे होते. संपूर्ण कुटुंब पर्यटनाचा आनंद घेत होतं.

नदीच्या काठावर उभी असलेली आजी आपल्या नातवाचं आनंद पाहून खुश होत होती. पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

काही सेकंदात पूल कोसळला. 100 पेक्षा जास्त पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले.

SCHOOL FIRST DAY: शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

काठावरील लोकांनी, स्थानिकांनी मदत केल्याने काहींचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस, एनडीआरएफ, शिवदुर्ग बचाव पथक अशा अनेक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या.

बचाव कार्य आणि शोध कार्य सुरू करण्यात आलं.

त्यावेळी नदीकाठी असलेल्या आजी आक्रोश करत होत्या. त्याचवेळी त्यांची मुलगी सुखरूप सापडली.

Share This News
error: Content is protected !!