कोल्हापूर – गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका शिक्षकाला गावकऱ्यांनी बेदम चोप देऊन त्याला अक्षरशः तुडवून काढले. यावेळी एका बाईने या शिक्षकाला दप्तराचे बडवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती मुलीने आपल्या आई-वडिलांना दिली, त्यानंतर शिक्षकाला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी हाणत असल्याचं दिसत आहे. वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एक महिला दप्तराने त्याला मारहाण करताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे.