‘….. तर मला एक नाही दोन जोडे मारा’, किरीट सोमय्या चप्पल दाखवत म्हणाले

374 0

नवी दिल्ली- अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर मला एक नाही, दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी आपल्या पायातील जोडा हातात घेतला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. 2013 ते 2021 या काळात सगळा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात ? त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला टॅक्स भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का ? त्या संबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.

Share This News

Related Post

Governor Bhagat Singh Koshyari : ” समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी “

Posted by - August 16, 2022 0
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन  मूल्यांची पेरणी व्हावी,…
Breaking News

Breaking News ! राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता ‘या’ दिवशी होणार

Posted by - July 31, 2022 0
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली…

पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही- अजित पवार

Posted by - February 12, 2022 0
पुणे- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचा म्हैसूरमध्ये भीषण अपघात; कुटुंबीय जखमी VIDEO

Posted by - December 27, 2022 0
म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये प्रल्हाद मोदी आणि…
Kishor Awarae

Kishore Aware : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ धक्कदायक खुलासा

Posted by - May 14, 2023 0
पुणे : पुणे येथील तळेगाव या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (kishore aware) यांच्यावर गोळीबार आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *