विक्रांत युद्ध नौका निधी प्रकरण, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

152 0

मुंबई- आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक निधी सोमय्या पितापुत्रांनी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आता या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका माजी सैनिकांने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?

‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सन १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ‘विक्रांत’ वाचवण्यासाठी सोमय्या यांनी सामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरातील व्यक्तींकडून 58 कोटी रूपये गोळा केले.

भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रभर आज आंदोलन करणार- संजय राऊत

किरीट सोमय्या खूप मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी आयएनएस विक्रांत या जहाजाच्या दुरूस्तीसाठी 700 बॉक्समध्ये पैसा जमा केला. जमा झालेला पैसा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला आहे. हे खूप मोठ प्रकरण आहे. काही पैसे त्यांनी पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून चलनात आणले. किरीट सोमय्यांनी त्यातील काही पैसे त्यांच्या मुलुंडच्या कार्यालयात ठेवले होते. किरीट सोमय्यांनी खूप मोठा घोटाळा केला असल्याने आम्ही आज राज्यभर आंदोलन करू असं संजय राऊत म्हणाले.

Share This News

Related Post

सांगलीमध्ये नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
सांगली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी सांगलीमध्ये भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या…

राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा हिंदुंनाच, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Posted by - May 4, 2022 0
मुंबई – जो पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज…
Gujrat News

Gujrat News : गुजरातमध्ये हमसफर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, धावत्या ट्रेनने अचानक घेतला पेट

Posted by - September 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील (Gujrat News) तिरुचिरापल्ली आणि श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना समोर…
Malegaon News

Malegaon News : खळबळजनक ! मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

Posted by - September 10, 2023 0
मालेगाव : मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना (Malegaon News) घडली आहे. यामध्ये सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. यामुळे…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

Posted by - April 11, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *