किरीट सोमय्या दापोलीला निघाले परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रतीकात्मक हातोडा घेऊन

169 0

मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघाले आहेत. दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणारच असा निर्धार केला आहे.

ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक हातोडा घेऊन अनेक कार्यकर्त्यांसह दापोलीकडे निघाले आहेत. नवी मुंबई मध्ये त्यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नील सोमय्या देखील होते. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज केलं आहे. उद्धव ठाकरेअनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे. दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत. मग एकावरच कारवाई आणि दुसऱ्यावर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला.

ठाकरे सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालणार असेल तर कारवाई त्यांच्यावरही होणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन हे अनधिकृत रिसॉर्ट आहे असे सांगावे’ असे त्यांनी आव्हान दिले.

सोमय्या म्हणाले, की ‘हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हातपाय त्यांनी कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून मी वाचलो. माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेड कॅटेगिरी सुरक्षा आहे. मी पुरावे दिलेत आणि मलाच जेलमध्ये टाकू म्हणतात. नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर अजून कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागतात. हे चालू देणार नाही. माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही’.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे कॅबिनेट प्रताप सरनाईक यांचे अनधिकृत बांधकाम वाचण्यात मग्न आहे. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला.

Share This News

Related Post

कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

Posted by - March 1, 2023 0
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक…

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपतची कारवाई; 1 लाखाची लाच घेताना लिपिक जाळ्यात VIDEO

Posted by - March 21, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

Posted by - June 12, 2022 0
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र,…

RAJ THACKREY : ” नुपूर शर्मा यांना सबंध जगभरातील मुस्लिम बांधवांची माफी मागावी लागली ,ओवैसी आमच्या देवतांना मनहूस म्हणतात , त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ का येत नाही ? VIDEO

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये आयोजित केला होता . यावेळी…

तुम्हाला माहित आहे का ? मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे ‘हे’ आहे कारण

Posted by - January 14, 2023 0
हिंदू सणासुदीला सामान्यपणे काळ्या रंगाचे कपडे वापरले जात नाहीत. कारण काळा रंग अशुभं असल्याचं मानलं जातं. मात्र हाच काळा रंग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *