किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

155 0

मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत निधीचा अपहार केल्याचा आरोप केला होता. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात एका निवृत्त जवानाने ट्रॉमबे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.

या प्रकरणी सोमय्या पितापुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले. आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना काल पोलीस ठाण्यात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं होतं. मात्र सोमय्या पिता-पुत्र काल चौकशीला हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.

सोमय्या यांचा पोलिसांकडून शोध

सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आलीय. या पथकांनी किरीट सोमय्यांचा कसून शोध सुरू केलाय. किरीट सोमय्यांचं कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी पथकं भेटी देत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या घरापर्यंत पोहचली असून तिथे काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसंच त्यांच्या घराखाली असलेल्या त्यांच्या कार्यालयात जाऊन आर्थिक गुन्हे शाखेने काही कागदपत्रही तपासली.

मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं असून उद्या चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. किरीट सोमय्या यांच्या घरी कोणी नसल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस चिकटवली आहे. किरीट आणि नील सोमय्या या दोघांच्या घराबाहेर नोटीस चिकटवण्यात आली असून दोघांनाही उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

सोलापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : जनता थेट करणार गावच्या सरपंचाची निवड; सरपंचपदासाठी 1068 अर्ज दाखल, वाचा सविस्तर

Posted by - December 3, 2022 0
सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यावेळी सरपंचाची निवड थेट जनता करणार असल्यामुळे…

मोठी बातमी! राज्यात 5 रुपयांनी पेट्रोल आणि 3 रुपयांनी डिझेल होणार स्वस्त

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला असून राज्यात  एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन…

अभिजीत बिचुकलेंची अजब गजब मागणी ; म्हणे, ” माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…! ” कारण ,

Posted by - February 23, 2023 0
पुणे : सध्या अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार आहेत. आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत…
Rajkumar Kohli

Rajkumar Kohli : ‘जानी दुश्मन’चे दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे निधन

Posted by - November 24, 2023 0
मुंबई : हिंदी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन…

Breaking News ! रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला मालाडमधून अटक

Posted by - June 2, 2022 0
पुणे- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी मालाडमधून अटक केली आहे. सुधीर लाड असे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *