केतकी चितळेला बेल की जेल आज निर्णय होणार !

424 0

ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपते आहे. तिला आज पोलीस ठाणे न्यायालयात हजर करणार आहे. कोठडीत वाढ होणार की तिची जामिनावर सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक झाली. या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले. तसेच इतरही राजकीय पक्षांकडून केतकी चितळेवर जोरदार टीका झाली होती. केतकीच्या विरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी केतकीच्या अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. यात तिच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांनी लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. अशी माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेकडून केतकी चितळे हिची 8 तास कसून चौकशी करण्यात आली. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईल मधील तांत्रिकदृष्टया बाबींबाबत ठाणे सायबर सेलकडून तांत्रिक बाबींचा रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे तिला आज तरी दिलासा मिळणार की केतकीचा कोठडी मुक्काम आणखी वाढणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!