लालमहालातील ‘त्या’ लावणीच्या व्हिडीओवर जितेंद्र आव्हाड संतप्त

465 0

पुणे- पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालामध्ये अलीकडेच एका लावणीचे शूटिंग करण्यात आले. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी या लावणीवर नृत्य करण्यात आले. या कृतीवर आता समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे.

सध्या गाजत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर डान्सर वैष्णवी पाटील नृत्य करताना व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केले आहे. पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी ही नृत्यांगना बेभान होऊन अदाकारी करत नृत्य करीत आहे. या व्हिडिओवरून आता समाजाच्या सर्व स्तरातून, विविध संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असताना हे शूटिंग कसे करण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे. सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जातोय.

लाल महाल ही वास्तू नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची नव्हे- जितेंद्र आव्हाड

या सर्व प्रकारावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे. ते म्हणतात, “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका”

Share This News
error: Content is protected !!