Jayant Narlikar passes away: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचं निधन

2545 0

Jayant Narlikar passes away: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि आयुका (IUCAA) चे संस्थापक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. Jayant Narlikar passes away:

वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. नारळीकर यांनी खगोलभौतिकी आणि ब्रह्मांडशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘हॉएल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ (Hoyle–Narlikar theory of gravity) मांडला, जो आइन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांत आणि माखच्या तत्त्वांचा समन्वय करतो . त्यांनी ‘क्वासी-स्टेडी स्टेट कॉस्मोलॉजी’ या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयक पर्यायी सिद्धांताचा विकास केला. १९८८ मध्ये त्यांनी पुण्यात ‘आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र’ (IUCAA) ची स्थापना केली आणि भारतीय खगोलशास्त्राच्या विकासात मोलाचा वाटा उचलला .

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

विज्ञानाच्या प्रसारासाठी डॉ. नारळीकर यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानकथा, विज्ञानविषयक लेखन आणि आत्मचरित्र लिहिले. त्यांचे ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्र २०१४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झाले . त्यांनी विज्ञानकथांच्या माध्यमातून विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले

विज्ञानकथा यक्षांची देणगी, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, टाईम मशीनची किमया, प्रेषित

विज्ञानविषयक आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, विज्ञानाची गरूडझेप, विज्ञानाचे रचयिते, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान

आत्मचरित्र चार नगरांतले माझे विश्व, पाहिलेले देश भेटलेली माणसं

इंग्रजी पुस्तकं The Lighter Side of Gravity, From Black Clouds to Black Holes, An Introduction to Cosmology, The Scientific Edge

CHHAGAN BHUJBAL: ठरलं! अखेर छगन भुजबळ मंत्री होणार; उद्या शपथविधी

🏅 पुरस्कार आणि सन्मान

१९६५: पद्मभूषण

२००४: पद्मविभूषण

१९९६: युनेस्कोचा कलिंगा पुरस्कार

२०१०: महाराष्ट्र भूषण पुरस्कार

२०१४: साहित्य अकादमी पुरस्कार

२०२३: ‘गोविंद स्वरूप लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ (ASI)

भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणारी YOUTUBER JYOTI MALHOTRA कोण आहे?

Share This News
error: Content is protected !!