पुणे बाणेर(PUNE BANNER) येथील एका ३२ वर्षीय आयटी इंजिनिअरने लायन्स पॉईंट येथे दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीरेंद्र सिन्हा (VIRENDRA SINHA)असे या मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी १२ फेब्रुवारी पहाटे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘शिवदुर्ग’ रेस्क्यू टीमने अत्यंत दुर्गम भागातून मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला.
मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र यांची चारचाकी गाडी गुरुवारी सकाळी लायन्स पॉईंट येथे संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. तातडीने तपास केला असता, वीरेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पत्नीला आणि मित्रांना ईमेल व मेसेजद्वारे या निर्णयाची माहिती दिली असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘शिवदुर्ग’ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती, त्याच्या समोरील दरीत साधारण २५० फूट खाली वीरेंद्र यांचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्गच्या २० सदस्यांच्या टीमने अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी ४:३० च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि खोल दरीत उतरून ही शोधमोहीम फत्ते करणाऱ्या टीममध्ये खालील सदस्यांचा समावेश होता
योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार,देवश्री चिले, सचिन गायकवाड सर,कुणाल कडू,कपिल दळवी,योगेश दळवी,सागर दळवी,सागर कुंभार,अनिल आंद्रे,गणेश भांगरे,पिंटू मानकर,महादेव भवार,गणेश म्हसकर,ज्ञानेश्वर आखाडे,संतोष मरगळे,चंद्रकांत गाडे,आनंद गावडे