Indurikar Maharaj

इंदुरीकर महाराज अपघातातून थोडक्यात बचावले ! चालक जखमी

504 0

जालना- कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले. इंदोरीकर महाराज हे परतूर शहरात रात्री कीर्तनासाठी जात असताना त्यांच्या स्कॉर्पिओ कार लाकडं वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात त्यांच्या कारचा चालक जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले असता शहरातील साईनाथ कॉर्नरजवळ हॉटेल मधूबन समोरील रस्ताक्रॉस करणाऱ्या लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरवर महाराजांची स्कॉर्पिओ जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात इंदुरीकर थोडक्यात बचावले मात्र त्यांचा चालक जखमी झाला. अपघातानंतर पोलिसानी महाराजांना दुसऱ्या वाहनातून कीर्तनासाठी खांडवीवाडी रवाना केले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी चालकावर
सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!