प्रतीक्षा संपली ! इयत्ता बारावीचा निकाल उद्या

345 0

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे म्हटले होते. मात्र ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी डोळे लावून वाट पाहात होते. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात 13 वी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!