‘नातवंड द्या नाहीतर पाच कोटी रुपये द्या…’मुलगा आणि सुनेविरोधात जोडप्याची न्यायालयात याचिका

541 0

हरिद्वार- उत्तराखंडमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांशी एक वेगळे नाते असते. वृद्धापकाळात नातवंडांसोबत वेळ घालवणे हाच त्यांचा विरंगुळा असतो. मात्र उत्तराखंडांत एका जोडप्याने आपला मुलगा आणि सुनेविरुद्ध अजब प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे.

खटला दाखल करणारे संजीव रंजन प्रसाद भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर ते पत्नीसोबत राहतात. त्यांनी 2016 मध्ये आपल्या मुलाचं लग्न नोएडा येथील एका मुलीशी लावून दिलं. त्यांचा मुलगा पायलट आहे आणि सूनही नोकरीला आहे. प्रसार माध्यमांसोबत बोलताना प्रसाद म्हणाले, ” मुलाला चांगले शिक्षण देऊन अमेरीकेत प्रशिक्षणाला पाठविण्यासाठी आपली सगळी जमापुंजी खर्च केली. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही. मुलाच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत, लवकरच आम्हाला आमच्या नातवाचा किंवा नातीचा चेहरा दिसेल, अशी आशा होती. पण तसं झालं नाही. नातू असो की नात, आम्हाला याचा फरक पडत नाही. आम्हाला फक्त आमच्या कुटुंबात मुल हवं आहे.

आता मुलाने आणि सुनेने आम्हाला एकटे टाकले आहे. आम्ही घरासाठी बॅंकेकडून कर्ज घेतलं. आता आम्ही आर्थिक आणि वैयक्तिकरित्या त्रस्त झालो आहोत. त्यासाठी आम्ही मुलगा आणि सून या दोघांकडून अडीच अडीच कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!