मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

381 0

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आल्याचं पाहायला मिळत आहे. आज ते पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर मुंबई कोल्हापूर सातारा या ठिकाणी पोलिस ठाण्यांमध्ये सदावर्ते यांना दाखल करण्यात आला होता त्या पाठोपाठ आता पुण्यातील कात्रज येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

त्यामुळं आता सदावर्ते यांना चौकशीनंतर सदावर्ते यांना पुन्हा अटक होणार ? की दिलासा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Share This News
error: Content is protected !!