सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या अटकेत आहेत.
सातारा पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. ती नामंजूर करुन सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आता मुंबईला आणण्यात येणार असून ऑर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ. जयश्री पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. अॅड. जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल असून त्या अद्याप न्यायालयासमोर आल्या नाहीत. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात आणले जात असताना त्या वेळेला त्यांनी चक्क खा. उदयनराजे यांची कॉलर उडवण्याची स्टाईल मारत न्यायालयात प्रवेश केला. गुणरत्न सदावर्ते यांची ही स्टाईल पाहून अनेकजण अवाक झाले.