नवी दिल्ली- देशात जीएसटीचा कायदा लागू केल्यानंतर आतापर्यंतचा विक्रमी जीएसटी मार्चमध्ये जमा झाला आहे. या मार्चमध्ये 1.42 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. या आधी जानेवारी महिन्यामध्ये 1.40 लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यामध्ये 1,42,095 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. त्यामध्ये केंद्राच्या CGST चा हिस्सा 25,830 कोटी रुपये आणि राज्याच्या SGST चा हिस्सा हा 32,378 कोटी रुपये इतका आहे.
IGST चा हिस्सा हा 39,131 कोटी रुपये आणि सेसचे योगदान हे 9417 कोटी रुपये इतकं आहे. यामध्ये 981 रकोटी रुपयांचे कलेक्शन हे सामानाच्या आयातीवर लावण्यात येणार आहे. ग्रॉस जीएसटी कलेक्शन आतापर्यंत सर्वाधिक जास्त आहे.