Gold Rate Today

Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं

4657 0

मुंबई : सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Rate) दररोज बदल होत असतात. ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदी महाग होत असल्यामुळे ग्राहकांना घाम फुटला आहे. सर्वसामान्यांना आधीच महागाईच्या झळा सोसावे लागत आहे. त्यातच सोनं आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्डब्रेक वाढ होताना दिसत आहे. परिणामी अनेक ग्राहकांनी सोनं आणि चांदीची खरेदी थांबवली होती. भविष्यात सोनं स्वस्त होणार की आणखीन महागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

किती रुपयांनी वाढले सोने?
आज (21 मार्च ) सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. धातुच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांत सोनं तब्बल 3 हजारांनी महाग झाले आहे. त्यातच आज पुन्ही सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून चांदीचे दर ही गगनाला भिडले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6,195 रुपये आणि 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,570 रुपये असणार आहे. आज सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत 78,500 रुपये असेल. चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत का वाढ होत आहे?
सराफा बाजारातील तेजीचे कारण म्हणजे यूएस फेडच्या धोरणात दर कपातीची चिन्हे आहेत. बैठकीत (मार्च 2024), यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर जसेच्या तसे ठेवून वर्षाच्या अखेरीस तीन व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले. यामुळे 10 वर्षांचे सरकारी रोखे तयार झाले आणि डॉलरचा पेग रिकामा झाला आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!