मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणार ‘ Fourth Lane ‘ ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

217 0

मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गीकेच्या विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

Maharashtra Assembly Live ( Date 22-08-2022 ) | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, ऑगस्ट – २०२२ ( थेट प्रक्षेपण ) | Maharashtra Assembly Monsoon Session Live Telecast August-2022 | By Maharashtra Assembly Live | Facebook

महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक खूप वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. या सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरची माहिती तत्काळ मिळेल. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्रणेत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाईल. अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावरील अपघातात झालेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणीवा राहिल्या का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

Posted by - September 20, 2022 0
प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींच्या बैठकीत दोन्ही ठराव एकमताने मंजूर मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

Posted by - January 28, 2022 0
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा…

महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाचा ३० वा वर्धापन दिन : महिला आयोग-फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ

Posted by - January 24, 2023 0
     मा.मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा…

Breaking News ! उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचा मुंबई सत्र न्यायालयाचा आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांना काल, गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.…

रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

Posted by - January 21, 2023 0
मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *