CHHAGAN BHUJBAL:  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.CHHAGAN BHUJBAL :

CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?

1219 0

CHHAGAN BHUJBAL:  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.CHHAGAN BHUJBAL :

ही खंडणी कुणी मागितली आणि ही खंडणी मागण्याचे नेमकं कारण काय आहे पाहुयात.

छगन भुजबळ यांना 1 कोटीच्या खंडणीसाठी धमकी?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना एका व्यक्तीने फोन करून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली. खंडणी मागण्यासाठी आरोपींना चांगलीच शक्कल लढवली. या व्यक्तींएक कोटी रुपयांची खंडणी मागताना मी आयकर विभागाचा अधिकारी असल्याचा बनाव केला. तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसे आहेत. तेथे आयकर विभागाची धाड पडणार आहे.मी देखील आयकर विभागाचा अधिकारी आहे. धाड टाकणाऱ्या टीममध्ये माझा सहभाग आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील, असं म्हणून संबंधित व्यक्तींना भुजबळ यांना धमकाबत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये याबाबत चर्चा झाली.संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर इथं पैसे घेऊन बोलावले होते, मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. परंतु पोलिसांनी सापळा रचत या आरोपीला अटक केली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी नाशिक-गुजरात महामार्गावरून करंजाळी येथून राहुल भुसारे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. यानेच अशा प्रकराची खंडणी मागितली, असा पोलिसांना संशय आहे.पोलीस या खंडणीच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. भुजबळ हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्याच्या भूमिकेला राज्याच्या राजकारणात मोठे वजन आहे. सध्या ते अजित पवार यांच्या पक्षात आहेत. तरी देखील सत्तेतील एका माजी मंत्र्यांना धमकी आल्याने राजकारणात एकच उडाली असून, याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडून काय धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे

SHRIMANT BHAUSAHEB RANGARI GANPATI: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

DR. SHIRISH VALSANGKAR: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट;मनीषा मानेच्या अकाउंटमध्ये 70 लाख आले कुठून ?

MAHALAXMI & JYOTIBA TEMPLE| कोल्हापुरातील अंबाबाई व ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू

Share This News
error: Content is protected !!