पुण्यात विद्युत मोटार कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात

507 0

पुणे- पुणे महापालिकेजवळ असलेल्या विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला आज बुधवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममधील ७० टक्के कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेबाबत पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, मंगला टॉकीज शेजारील परिसरात चार मजली व्यवसायिक इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर विद्युत मोटार कंपनीचे रेकॉर्ड रूम आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होते.

इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच सुरुवातीला कसबा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र मोठ्या प्रमाणात आग आणि धूर असल्याने अग्निशमन दलाच्या आणखी चार गाड्या घटनास्थळी मागून घेण्यात आल्या. गाड्यांनी सर्व बाजूंनी पाण्याचा फवारा मारत सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शेलार, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, सुनील टेंगळे, प्रताप फणसे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!