चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

672 0

पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चिंचवडगावातील जैन शाळेजवळ घडली. सुदैवाने अग्निशमन दलाने सहा भरलेले सिलेंडर तत्काळ हलवल्याने पुढील अनर्थ टळला.

मनी तेवर (वय ३२) आणि प्रदीप कुमार (वय २०) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघांवर आयसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी नाश्ता करण्यासाठी ग्राहक याठिकाणी आलेले असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सिलिंडरला आग लागली तेव्हा त्या ठिकाणी आणखी सहा भरलेले सिलिंडर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ हे सिलिंडर बाजूला घेतल्याने पुढील अनर्थ टळला. अवघ्या दहा मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

Share This News
error: Content is protected !!