बोपखेल : सोमवारी पहाटे 2.30 वाजता राम नगर, बोपखेल येथे रिक्षा ( MH 12 QR 8919) पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात दीपक तपासे यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षावर पेट्रोल टाकण्यात आले असून माचिसच्या काड्या देखील सापडून आल्या आहेत.
हि रिक्षा कोणी आणि का पेटवून दिली याचा अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत.