मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती.
या आधी ईडीकडून संजय राऊतांना समन्स बजावण्यात आलं होतं मात्र पावसाळी अधिवेशनाचं कारण देत राऊतांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर छापा टाकला. संजय राऊतांची आणि त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 9 तास चौकशी झाली. ईडी अधिकाऱ्यांनी राऊतांच्या भांडूप येथील घरापाठोपाठ त्यांच्या दादर येथील घरावरदेखील सकाळी छापा टाकला व संजय राऊतांच्या चौकशीला सुरुवात केली आणि सलग 9 तासांच्या चौकशी नंतर अखेर त्यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे.