ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

398 0

पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पिंपरी कॅम्प मधील साई चौकातील जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स व लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या दोन दुकानांवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल इस्तेखार खान ( वय -26 रा . एसएनबीपी शाळेसमोर मोरवाडी , पिंपरी ) याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र सोहन सिंग ( वय 36 रा कसबा पेठ , मुळ रा . बिरोलीया , राजस्थान ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलजीएफ डिफेन्स कंपनीत तपासणी अधिकारी म्हणून काम करतात . कॉपी राईट हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे ते कारवाई करतात. फिर्यादी यांना पिंपरी येथील साई चौकातील दोन दुकानामध्ये सुपरड्राय या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पॅट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याकडे तक्रार अर्ज करुन कारवाईची परवानगी मागितली होती.

पोलीस उपायुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पिंपरी पोलिसांनी फिर्यादी समक्ष या दोन दुकानांवर धाड टाकली. यावेळी जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स या दुकानातून ३१२ बनावट जीन्स तर लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या २०० बनावट जीन्स जप्त करण्यात आल्या. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Posted by - November 29, 2023 0
पुणे : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा (Pune News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषबाधेमुळे…

वनविभागाचा मोर्चा वळाला विशाळगडावर; ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

Posted by - December 9, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले महाराष्ट्रात आजही खंबीरपणे उभे आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूंवर…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारमधून संसदेत पोहोचले ! काय आहे ही कार ?

Posted by - March 30, 2022 0
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आज ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सुसज्ज कारमधून संसदेत आगमन…

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; मोदी सरकारचे नवीन आदेश

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. अशातच आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *