24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी कधी पाहिली आहे का ? किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

1749 0

आतपर्यंत मँगो, पिस्ता, चॉकलेट फ्लेवरच्या कुल्फी आपण ऐकल्या असतील पण सोन्याची कुल्फी आणि त्यातही 24 कॅरेट अस्सल सोन्याची कुल्फी असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ? हीच सोन्याची कुल्फी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ‘क्लासिक डेझर्ट : सोन्याच्या कुल्फी’चं वेगळंच रुप दाखवण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे या कुल्फी विक्रेत्याने त्याच्या गळ्यात सोन्याचा भला मोठा हार घातला आहे. त्याच्या गळ्यात सोन्याच्या अनेक चैनी आहेत. हातात सोन्याच्या अनेक अंगठ्या आहेत. तसेच हातातील सोन्याचं कडंही प्रचंड मोठं असून ते पाहिल्यावर डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही. सोन्याचे दागिने घातलेला हा कुल्फीवाला आणि त्याची सोन्याची कुल्फी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि विशेष म्हणजे या सोन्याची कुल्फीची किंमत आहे केवळ 351

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!