कर्मचाऱ्यांना आता शनिवारी आणि रविवारी देखील करावे लागणार काम ! संपामुळे कामाचा लोड वाढला

441 0

पुणे : कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्च 23 मार्च या कालावधीत संप पुकारला होता. त्यामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ही काम करणं आता गरजेचं असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी देखील काम करावे लागणार आहे.

राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता कमी वेळ राहिला असून, 2022-23 या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या तरतुदी वर्ष संपण्यापूर्वी शंभर टक्के खर्च करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे 6 फेब्रुवारीच्या शासनाच्या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची कार्यवाही 31 मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या 14 ते 20 मार्च या कालावधीत संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते.

हे आर्थिक कामकाज पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परिपत्रकानुसार 31 मार्च पूर्वी दिलेल्या निधीचा वापर करणे आवश्यक असल्याकारणाने देयके मंजूर करून अनुदानाची रक्कम जमा करणे, वेतन जमा करण्यासाठी आवश्यक ती कामे आणि आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करण्यासाठी 25 आणि 26 मार्चला देखील कार्यालय सुरू ठेवून दिलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत परिपत्रकात आदेश देण्यात आले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!