मुंबई- मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकून मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
एनसीबीने केलेल्या या कारवाईत 970 ग्रॅम अॅम्फेटामाइन , 104 ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट , 02 ग्रॅम वजनाचे LSD चे 100 पेपर ब्लॉट आणि 25 ग्रॅम कोकेन जप्त केले. ड्रग्ज प्रकरणी एकाला मुंबईतून तर दुसऱ्याला गोव्यातून ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर अमली पदार्थ विरोधी पथकाने 23 मे 2022 रोजी अंधेरी पूर्व येथे एका ठिकाणी छापा टाकून 970 ग्रॅम अॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेले ड्रग्ज चार वेगवेगळ्या गडद तपकिरी रंगाच्या लाकडी अॅशट्रेमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. हे पार्सल न्यूझीलंडला नेण्यात येणार होते.
25 मे 2022 रोजी फॉरेन पोस्ट ऑफिस, मुंबई येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत 104 ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट, 02 ग्रॅम वजनाचे LSD चे 100 पेपर ब्लॉट्स आणि 25 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेले ड्रग्ज दोन सिल्व्हर फॉइल पॅकेटच्या आत कार्डबोर्डमध्ये लपवून ठेवण्यात होते. हे पार्सल फ्रान्समधून आणले होते आणि ते गोव्यात पाठवण्यात येणार होते. अशी माहिती समोर आली आहे. एनसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत.