DR. SHIRISH VALSANGKAR डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र याच प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय. आणि त्यामुळेच या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर DR. SHIRISH VALSANGKAR आत्महत्या प्रकरणात मनीषा मानेबद्दलची नवी माहिती समोर आली आहे. 2024 पूर्वी वळसंगकर यांच्यावर रुग्णालयातील आर्थिक अधिकार हे याच महिलेला होते. मात्र ही महिला आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा संशय आल्याने 2024 नंतर हे सर्व अधिकार डॉक्टरांनी स्वतःकडे ठेवले. त्यामुळेच या महिलेला ते सहन झालं नाही.

DR. SHIRISH VALSANGKAR: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट;मनीषा मानेच्या अकाउंटमध्ये 70 लाख आले कुठून ?

1642 0

DR. SHIRISH VALSANGKAR डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र याच प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय. आणि त्यामुळेच या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर DR. SHIRISH VALSANGKAR आत्महत्या प्रकरणात मनीषा मानेबद्दलची नवी माहिती समोर आली आहे. 2024 पूर्वी वळसंगकर यांच्यावर रुग्णालयातील आर्थिक अधिकार हे याच महिलेला होते. मात्र ही महिला आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा संशय आल्याने 2024 नंतर हे सर्व अधिकार डॉक्टरांनी स्वतःकडे ठेवले. त्यामुळेच या महिलेला ते सहन झालं नाही.

DR. SHIRISH VALSANGKAR: डॉ‌. शिरीष वळसंगकर प्रकरणात मनीषा माने हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी

तिचा इगो दुखावला गेला आणि त्यातूनच तिने डॉक्टरांना बदनामी करण्याची धमकी दिली. ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 25 दिवसांत रुग्णालयातील 42 जणांचे साक्षीदार म्हणून जबाब घेतले आहेत. रुग्णालयाचे सीए गिरीशचंद्र चाफळकर यांच्याकडेही तपास केला. त्यावेळी 8 एप्रिल 2022 ते 7 डिसेंबर 2024 या काळात मनीषा यांनी स्वत:च्या तीन बॅंक खात्यांत 39 लाख 87 हजार 680 रुपये बेकायदेशीर पद्धतीने वळवल्याची बाब समोर आली. त्याचबरोबर रुग्णालयातील पाच व्यक्तींना रोख रक्कम देऊन ती रक्कम स्वतःच्या बँकेत ट्रान्सफर करून घेतली. त्याचबरोबर रुग्णालयाच्या कॅशिअर शीतल केत मनीषा मानेच्या सांगण्यावरून रुग्णांकडून दहा हजारांपर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या. हे पैसे नेमके कशासाठी वापरले जात होते याचा कोणताही हिशोब नाही. त्याचबरोबर टॅक्स न भरलेले 70 लाख 43 हजार 160 रुपये मनीषा यांच्या खात्यात आढळले. हॉस्पिटल कडून त्यांना मिळणारा पगार वगळून ही अधिकची रक्कम तीच्या खात्यात आहे. त्यामुळे तिच्याकडे हा पैसा कुठून आला ? असे किती बेकायदेशीर पैसे तिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आहेत अशा सगळ्याच गोष्टींचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यासाठीच पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. तर यावर युक्तिवाद करताना मनीषा मानेच्या वकिलांनी तिच्याकडे बेकायदेशीर रक्कम नसल्याचा दावा केला. रुग्णालयाकडून तिला एक लाख 80 हजार पगार आहे. सुट्ट्यांचे पैसे मिळून जवळपास दोन लाख रुपये प्रति महिना पगार येतो. त्यामुळे तिने आर्थिक गैरव्यवहार न केल्याचा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. मात्र या सगळ्या युक्तिवादानंतर तिला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिने दिलेल्या धमकीचा उल्लेख आढळून येतो. ‘ज्याला मी शिकवून आज एओ केलं आणि आज त्या व्यक्तीला चांगला पगार देतो आहे, त्यानेच खोटारडे, घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे अतीव दु:ख आहे, आणि म्हणूनच मी माझे जीवन संपवत आहे’, असा या सुसाईड नोटमध्ये आशय आहे. हा आशय मनीषा माने हिच्याबद्दल भाष्य करणारा असल्याचा वाटतं. त्याचबरोबर तिने केलेल्या आर्थिक फेरफार प्रकरणही पोलिसांना मोठा तपास करायचा आहे.

CHAKAN NEWS: पाठलाग केला, तोंड दाबलं, पडीक ठिकाणी नेलं अन्… पुण्यात महिलेबरोबर नराधमाचं राक्षसी कृत्य

MAHAD VINHERE NEWS;महाड विन्हेरे गावाजवळ भीषण अपघात; अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!