पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
येत्या बुधवारी सायंकाळी ५ वाजता काळे हे करमळकर यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. राज्यपाल व राज्य शासन यांच्यातील कुलगुरू निवडीबाबत सुरू असलेल्या वादामुळे पदाची निवड प्रक्रिया रखडली. त्यामुळे डॉ. नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाले नाहीत.
विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी शासनाने पूर्णवेळ कुलगुरू निवडीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.