मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे ; रामदास आठवले यांचा कवितेतून राज ठाकरेंना टोला 

381 0

आधी गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार. असा अल्टीमेटम देत राज यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांना भगव्या रंग इतका प्रिय होता, तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या असतात पण सभेत गर्दी असूनही त्यांना मतं मिळत नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रामदास आठवले आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी रामदास आठवले म्हणाले, राज्यात सध्या भोंग्याचं राजकारण तापलं आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे. मशिदींवर काढून भोंगे करू नका तुम्ही सोंगे अशाप्रकारे कवितेच्या माध्यमातूनही आठवले यांनी राज यांना टोला लगावला.

Share This News
error: Content is protected !!