श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

92 0

 

पुणे, दि.२५: श्री संत सोपानकाका पालखी सोहळा निमित्ताने बारामती तालुक्यात २७ जूनपर्यत वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.

बारामती तालुक्यातील निरा-बारामती रोडवरुन होणारी वाहतूक २६ जून २०२५ रोजी निरा कार्नर निंबुत वरुन मोरगाव रोडने चौधरवाडी फाट्यावरुन चौधरवाडीमार्गे करंजेपूल तसेच २७ जून रोजी निरा-बारामती रोडने होणारी वाहतूक ही कटींगपुल, बजरंगवाडी, को-हाळे खुर्द मार्गे होळ, वाणेवाडी, करंजेपूलमार्गे निरा यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!