मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आली त्यामुळे शुद्ध हरपली. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खोटी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. त्यांना तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
अजित पवार म्हणाले, ” मी डॉक्टरांशी बोललो, त्यांचे पूर्ण चेकअप करायचे आहे. आता त्यांची प्रकृती बारी असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन तीन दिवसांनी त्यांना सोडण्यात येणार असून आज त्यांना स्पेशल रूममध्ये हलवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना हार्टअटॅक आल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही”
मंगळवारी पक्ष कार्यालयात पवार साहेबांकडे असताना धनंजय मुंडे यांना भोवळ आली. त्यानंतर काहीवेळासाठी त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांना तातडीने बरीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना कोणतेही पथ्य नसून ते सर्व जेवण करू शकतात. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सोबत आहेत.