गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस – आशिष शेलार

286 0

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे घोडदौड सुरू आहे 

गोव्यातील विजयाचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस असून नरेंद्र मोदी हेच आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात असा लोकांमध्ये विश्वास असल्याचं मत माजी मंत्री आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.

4 राज्यातील भाजपा विजयाचा जल्लोष मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर साजरा करत असताना शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.