विठ्ठला…. कोणता झेंडा घेऊ हाती ? दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

316 0

मुंबई- बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आपला दावा सांगितला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. त्यामुळे नेमकी कोणती शिवसेना खरी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे.

दीपाली सय्यद म्हणतात की, ‘एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली’, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

‘सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू’, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय.

कालही दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले होते. ‘माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल’, असं त्या म्हणाल्या होत्या.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!