‘डेक्कन क्वीन’चा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा

555 0

‘डेक्कन क्वीन’ रेल्वेने आज 92 वर्ष पूर्ण करून 93 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पुण्याहून मुंबईला रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची ही लाईफलाईन मानली जाते.

आज पुणे रेल्वे स्थानकावर ‘डेक्कन क्विन’ चा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आणि सायंकाळी मुंबईहून पुण्याला येण्यासाठी रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या डेक्कन क्वीनचा वाढदिवस आज सकाळी 6.30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने मोठ्या थाटामाटात करण्यात आला.यावेळी विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे, तमिळ चित्रपटातील अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा अन्य रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी,आरपीएफ, रेल्वे पोलिस व प्रवासी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!