दुर्दैवी ! पुण्यात बेबी कालव्यात पडून बहीण-भावाचा बुडून दुर्देवी अंत

890 0

उरुळी कांचन- सायकल खेळताना तोल सुटल्याने सायकलसहित कालव्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

जागृती दत्तात्रय ढवळे (वय ६) आणि शिवराज दत्तात्रय ढवळे (वय ३ ) रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गांव देऊळगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्या भावंडाची नावे आहेत.

जागृती आणि शिवराय हे एका सायकलवर बसून कालव्यावरील भरावावर खेळत होते. जागृती ही सायकल चालवत असताना शिवराज हा पाठिमागे बसला होता. खेळता – खेळता जागृतीचा तोल सुटून सायकल कालव्यात पडून ही दोन्ही भावंडे कालव्यात वाहून गेली. मुले घरी आली नाही म्हणून चौकशी केली असता कालव्यात सायकल तसेच चपला आढळून आल्याने ही बालके कालव्यात पडल्याचे निदर्शनास आले. सुमारे तीन तासांच्या शोधानंतर ग्रामस्थांना दोन-तीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात या भावंडांचे मृतदेह आढळून आले.

Share This News
error: Content is protected !!