अखेर लोणावळ्याच्या जंगलात हरवलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह आढळला

567 0

लोणावळा- लोणावळ्याच्या घनदाट जंगलात ट्रेकिंगसाठी दिल्ली येथून आलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला. हा तरुण २० मे पासून बेपत्ता होता. एनडीआरएफ ची टीम या तरुणाचा शोध घेत असताना दरीतून मृतदेह कुजल्याचा वास आला. त्याठिकाणी एनडीआरएफच्या टीमने शोध घेतला सात या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

फरहान अहमद शाह असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीचा राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी फरहान लोणावळा परिसरात ट्रेकिंगसाठी आलेला होता. ड्युक्स नोज पॉंईंट येथे फिरावयास गेलेला असताना जंगल त्याचा रस्ता चुकला. शुक्रवारी २० मे पासून तो बेपत्ता झाला होता. दरम्यान त्याने आपल्या भावाला फोन करून आपण जंगलात हरवल्याचे सांगितले आणि सुटका करण्यास सांगितले. त्यानंतर काही फोन बंद झाला.

फरहानच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दिली. तसेच एक प्रसिद्धीपत्रक काढून त्याचा शोध घेणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. फरशांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या टीम देखील फरहानचा शोध घेत होती. आज त्याचा मृतदेह आढळून आला.

Share This News
error: Content is protected !!