.गुन्हेगारी जगतामध्ये एक काळ होता… जेव्हा ‘दया नायक’ हे नाव उच्चारलं की गँगस्टर्सचा थरकाप उडायचा.
हाच वर्दीतला वाघ म्हणून ओळखला जाणारे एसीपी दया नायक निवृत्त झालेत.. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक.. अंडर वर्ल्डला भिडणारा वर्दीतला वाघ..
“1970 च्या दशकात कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जन्मलेला एक सामान्य मुलगा. गरिबीमुळे शिक्षणात खंड पडतो..पण त्या मुलाच्या मनात जिद्द असते..1979 मध्ये मुंबईत नोकरीच्या शोधात आलेला तो मुलगा – वेटर म्हणून एका हॉटेलमध्ये काम करतो.दिवस हॉटेलमध्ये, रात्री गोरेगाव महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतो. मग एके दिवशी त्याने ठरवलं ‘मी पोलीस होणार.’1995 साली तो मुंबई पोलिसात भरती होतो… आणि पुढचा त्या मुलाचा प्रवास इतिहास बनतो.””1990 च्या दशकात मुंबईत गुन्हेगारीचा उद्रेक झाला होता. दाऊद इब्राहिम, अबू सालेम, छोटा राजन, छोटा शकिल, आणि विदेशी गँगस्टर यांनी मुंबईत हौदोस घातला होता. मुंबई शहराच्या गल्ली-गल्लीत बॉम्बस्फोट आणि हत्यांचे सत्र चाललं होतं.त्याच काळात एक नाव पुढे येतं – दया नायक. त्यांचं काम थेट, धाडसी आणि गुन्हेगारांना यम सदनी पाठवणार होतं.. दया नायक ने 86 एन्काउंटर केले. – त्यातील 22 दाऊद टोळीचे गुंड, 20 राजन टोळीचे, आणि काही एलटीटीई, लष्कर ए तैय्यबा सारख्या संघटनांचे सदस्य होते.”कंदहार विमान अपहरण प्रकरणात सामील असलेल्या 3 दहशतवाद्यांना त्यांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं – हे त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला.”प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दया नायक यांच्या वाट्याला अनेक वादही आले.
त्यांच्यावर कथित गैरव्यवहार, संपत्तीचे आरोप झाले… ते निलंबित झाले, त्यांच्यावर चौकशा झाल्या.पण प्रत्येक वेळी ते निर्दोष सिद्ध झाले आणि परत सेवेत दाखल झाले.””त्यांच्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण शेकडो पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते आदर्श बनले.सुमारे 31 वर्षांची सेवा पूर्ण करून, ACP पदावर ते निवृत्त झाले.
“गुन्हेगारी जगताला झुकवणारा, एक आदर्श पोलीस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट ACP दया नायक निवृत्त झाले.. पण त्यांनी गुन्हेगारी जगताशी दिलेल्या लढ्यामुळे.. आजही अनेक अधिकारी त्यांच्याकडून प्रेरणा घेतात… गुन्हेगारी जगताशी दिलेल्या लढ्याबाबत एन्काऊंटर स्पेशालिस्ट ACP दया नायक यांना सलाम..