rohit pawar 's post

“दादा… कुठं हरवलात तुम्ही?” रोहित पवारांची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

68 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित  पवार(ROHIT PAWAR)यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवार(ROHIT PAWAR) यांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांच्या(AJIT PAWAR) कामाच्या शिस्तीचा आणि महाराष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव केला. त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वी उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य आज अस्ताला गेला.” या शब्दांतून त्यांनी अजित पवारांचे राज्याच्या विकासातील योगदान अधोरेखित केले.

या पोस्टचा शेवट रोहित पवारांनी (ROHIT PAWAR) अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांनी केला आहे. त्यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले, “दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा!” त्यांच्या या ओळी वाचून अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, कौटुंबिक जिव्हाळा या ट्वीटमधून स्पष्टपणे दिसून येत आहे.

अजित पवारांना(AJIT PAWAR) अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या जनसमुदायाबद्दल आणि पवार कुटुंबाला आधार देणाऱ्या प्रत्येकाबद्दल रोहित पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली. “सर्वसामान्य माणसांचे ऋण पवार कुटुंब कधीच विसरणार नाही,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. अजित पवारांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबाचीच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला असल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे .

rohit pawar emotional post

 

Share This News
error: Content is protected !!