नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आले आहे. NTAGIने केलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या सल्लागार समितीने शिफारस केली होती की, जे लोक परदेशात प्रवास करणार आहेत, ते ९ महिन्याच्या सक्तीच्या कालावधीच्या आधी ज्या देशात जाणार आहेत तेथील आवश्यकतेनुसार करोना लसीचा बुस्टर डोस घेऊ शकता. आतापर्यंत १८ वर्षावरील ज्यांनी ज्यांनी करोनाची दुसरी लस घेऊन ९ महिने पूर्ण केले आहेत ते सर्वजण बुस्टर डोस घेऊ शकतात. हा कालावधी आता ३ महिने म्हणजेच ९० दिवसांचा करण्यात आला आहे.