देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरतीये, 24 तासात 50 हजार 407 नवे कोरोनाबाधित, 804 जणांचा मृत्यू

483 0

नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दैनंदिन कोरोनाबांधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून देशात गेल्या 24 तासात 50 हजार 407 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी कमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी देशात 58 हजार 77 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 657 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासात भारतात एक लाख 36 हजार 962 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 इतकी झाली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मक दर 3.48 वर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घ्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

आतापर्यंत सुमारे 172 कोटी डोस देण्यात आले

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 172 कोटी अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 46 लाख 82 हजार 662 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 172 कोटी 29 लाख 47 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!