Ravindra Chavan & Vilasrao Deshmukh

विलासराव देशमुखांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; वाद निर्माण होताच रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली दिलगीरी

599 0

लातूर(LATUR) महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण(RAVINDRA CHAVAN) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. लातूर(LATUR) शहरातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(VILASRAO DESHMUKH) यांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान करताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

सभेत बोलताना चव्हाण(CHAVAN)म्हणाले होते की, लातूरमध्ये(LATUR) कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विलासराव देशमुख(VILASRAO DESHMUKH) यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही. या वक्तव्यामुळे लातूरकरांमध्ये नाराजी पसरली असून अनेक नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. हा लोकनेत्याचा अवमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या वक्तव्यावर आमदार अमित देशमुख(AMIT DESHMUKH)यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “अशी भाषा वापरणे योग्य नाही. ही ना लातूरची(LATUR) संस्कृती आहे, ना महाराष्ट्राची,” असे ते म्हणाले. अभिनेता रितेश देशमुख(RITESH DESHMUKH) यांनीही प्रतिक्रिया देत, ” पुस्तकातील नाव पुसता येतं पण जनतेच्या मनात कोरलेल नाव कधीच कुणीही पुसू शकत नाही,” असे प्रतिउत्तर दिले .

दरम्यान, वाद उफाळून आल्यानंतर रवींद्र चव्हाण(RAVINDRA CHAVAN) यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर(CHATRAPATI SAMBHAJINAGAR) येथे बोलताना त्यांनी सांगितले की, “कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडून लातूरमध्ये(LATUR) विलासराव देशमुख(VILASRAO DESHMUKH) यांच्या नावावर राजकारण होत असल्याने विकासाच्या दृष्टीने हे विधान केले. अमित देशमुख(AMIT DESHMUKH) माझे मित्र आहेत, त्यामुळे या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढू नये.” असे चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले .

Share This News
error: Content is protected !!