पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे राज्यात आठवीपर्यंत परीक्षा आत्तापर्यंत तरी घेतली जात नव्हती. परंतु त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित रहात असून इयत्ता तिसरी पासून पुन्हा एकदा परीक्षा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
अर्थात या निर्णयावर अद्याप अंतिम निर्णय घेतला गेला नाहीये. शिक्षण तज्ञांशी चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले . तसेच परीक्षा घेतली तरीही आम्ही मुलांना अनुत्तीर्ण करणार असाही याचा अर्थ काढण्यात येऊ नये असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.