राज ठाकरे यांना ‘चुहा’ म्हणणारे बृजभूषण शरण सिंह आहेत तरी कोण ?

443 0

नवी दिल्ली- भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी बृजभूषण शरण सिंह यांनी स्वत:च्या मतदारसंघात साधूसंत आणि समर्थकांचा मेळावा आयोजित केला. उत्तर भारतीयांना मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, मगच अयोध्येत पाय ठेवावा, असा इशारा त्यांनी दिला आहे. एकूणच बृजभूषण शरण सिंह आहेत तरी कोण याची सर्वांना उत्सुकता आहे.

बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातुन लोकसभेवर निवडून आले आहेत. बृजभूषण शरण सिंह हे एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 6 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. बृजभूषण शरण सिंह हे सुद्धा आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. 1993 मध्ये राम मंदिर आंदोलनानंतर वादग्रस्त घुमट पाडल्याप्रकरणी ज्या 40 आरोपींना अटक झाली होती, त्यामध्ये बृजभूषण शरण सिंह यांचाही समावेश होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह मैदानात उतरले आणि पहिल्यांदाच खासदार झाले.

बृजभूषण शरण सिंह हे सध्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. बृजभूषण शरण सिंह यांना व्यायामाची आवड आहे. कुस्ती, धावणे, घोडेस्वारी हा त्यांचा छंद आहे. या स्पर्धांमध्ये त्यांच्या नावे अनेक पैजा, अनेक स्पर्धा भरवल्या जातात. बृजभूषण शरण सिंह यांनी 1979 मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1987 मध्ये ऊस परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवून ऊस परिषदेचे अध्यक्ष झाले. विद्यार्थी संघटना, ऊस परिषद, शेतकरी आंदोलन हे सुरु असताना बृजभूषण शरण सिंह हे 1988 मध्ये भाजपच्या संपर्कात आले. भाजपमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर एक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. भाजपकडून त्यांनी पहिल्यांदा विधानपरिषद निवडणूक लढवली. मात्र त्यांचा 14 मतांनी पराभव झाला.

बृजभूषण शरण सिंह यांचे भाजपमध्ये काहीकाळ मतभेद झाले. वैयक्तिक नाराजीमुळे त्यांनी थेट भाजपला रामराम ठोकला आणि समाजवादी पक्षात (SP) प्रवेश केला. सपाकडून त्यांनी कैसरगंजमधून लोकसभेची निवडणूक लढली आणि जिंकली. मात्र सपामध्ये वैचारिक मतभेदामुळे त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचं कमळ हाती घेतलं.

बृजभूषण शरण सिंह हे सुद्धा आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. 1993 मध्ये राम मंदिर आंदोलनानंतर वादग्रस्त घुमट पाडल्याप्रकरणी ज्या 40 आरोपींना अटक झाली होती, त्यामध्ये बृजभूषण शरण सिंह यांचाही समावेश होता. बृजभूषण शरण सिंह यांनी रामजन्मभूमी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. अयोध्येतील महंत रामचंद्र परमहंस, नृत्य गोपाल दास, हनुमान गढीचे स्वामी धर्मदास यांचा आशिर्वाद घेऊन ते मंदिर आंदोलनात उतरले होते. इथेच त्यांची लालकृष्ण आडवाणींश भेट झाली. आंदोलनातील सक्रीय सहभागानंतर बृजभूषण शरण सिंह यांना जेलमध्येही जावं लागलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!